पीकेएफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘ग्रीन वॉकथॉन’; देशभरात 5,000 रोपांची लागवड करण्याचा संकल्प

पीकेएफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘ग्रीन वॉकथॉन’; देशभरात 5,000 रोपांची लागवड करण्याचा संकल्प

मुंबई, 21 नोव्हेंबर: पीकेएफ इंडियाने आपल्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी माझगाव येथील जोसेफ बॅप्टिस्टा गार्डनमध्ये ‘वॉक फॉर अ कॉज – ग्रीन एन्व्हायर्नमेंट’ या उपक्रमाचे आयोजन केले. या विशेष वर्षानिमित्त संस्थेने देशभरात 5,000 रोपांच्या लागवडीसाठी योगदान देण्याचा संकल्प केला आहे.

सकाळी 7.00 ते 9.30 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या वॉकथॉनमध्ये पीकेएफ श्रीधर अँड संथानम एलएलपी, पीकेएफ कन्सल्टिंग एलएलपी आणि पीकेएफ सर्वहब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या 130 हून अधिक कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचा समारोप वृक्षारोपणाने करण्यात आला.

या प्रसंगी माजी आमदार यामिनी जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिकांची उपस्थिती लाभली. समूहाच्या वरिष्ठ नेतृत्वातील रवि सूर्यनारायणन, राजेश कुमार शर्मा, रामनारायण, जिनेश दमानिया, रौनक अग्रवाल, नारायण प्रभू आणि वेंकटेशन के. यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदविला.

पीकेएफ इंडिया आपल्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त देशातील विविध शहरांमध्ये अशाच पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करत असून, शाश्वत आणि हरित भविष्यासाठी आपले योगदान दृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

पीकेएफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘ग्रीन वॉकथॉन’; देशभरात 5,000 रोपांची लागवड करण्याचा संकल्प