बीएसएफ बहुउद्देशीय संस्था,उपेक्षित नायक न्युज,संत कबीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था बुलढाणा यांच्या वतीने यश पॅलेस अमरावती येथे ‘समाज क्रांती’ पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड बुक आणि गिनिज बुक रेकॉर्ड विजेते लेखक दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख दिग्दर्शित व स्मिता धकिते आणि नंदकिशोर धकिते निर्मित ‘ऍट पोस्ट बिहाली’ या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले.लवकरच हिंदी आणि मराठी भाषेतून संपूर्ण जगभरात सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
फिल्म इंडस्ट्री तसेच मीडिया आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना ‘समाज क्रांती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर विशाल धेंडे,प्रॉडक्शन मॅनेजर गणेश गोरे तसेच सिनेमा सृष्टीतील दिग्दर्शक,निर्माते,कलावंत,पत्रकार इत्यादी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.
भुषण सरदार,रॉयल सरदार यांनी विशेष प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सांगळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख यांनी केले.
नंदकिशोर धकिते निर्मित,अल्ताफ शेख दिग्दर्शित ‘ऍट पोस्ट बिहाली’ सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर.